“ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण…” – मेघना एरंडे जोशी

‘सनई चौघडे’ मालिकेतील पमा परबच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मेघनाच्या होळीच्या खास आठवणी होळीच्या रंगांनी आणि नव्या सुरुवातीच्या उत्साहाने नटलेल्या या वातावरणात अभिनेत्री मेघना एरंडे जोशी आपल्या आवडत्या सणाविषयीच्या गोड आठवणींना उजाळा देत आहेत. ‘सनई चौघडे’ मालिकेत पमा परब ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या मेघना होळीच्या आठवणी आणि यावर्षीच्या खास कारणांबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या. रंग, संगीत… Read More “ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण…” – मेघना एरंडे जोशी

‘सनई चौघडे’ मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

स्टायलिश आणि दमदार नायकाच्या भूमिकेत राज हंचनाळे झी मराठीवरील नव्या ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळे एका दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. जय खानोलकर ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. बाहेरून पाहता तो थोडा कठोर आणि अॅटिट्युड असलेला वाटतो; मात्र मनाने तो अतिशय संवेदनशील आहे. त्याच्या आयुष्यात त्याची आजी,… Read More ‘सनई चौघडे’ मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणे तसं दुर्मिळच मानलं जातं. मात्र आगामी ‘सालबर्डी’ या चित्रपटात ही चौकट मोडत अभिनेत्री पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय. मनोरमा प्रधान असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी… Read More पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज

स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी

स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देत ‘तिघी’चे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन स्त्रीच्या भावविश्वाचा, तिच्या स्वाभिमानाचा आणि तिच्या अंतर्गत ताकदीचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या चित्रपटाचे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन सुरू आहे. आई-मुलींच्या नात्याची भावनिक कथा सांगणारा हा चित्रपट केवळ नात्यांचा प्रवास नाही, तर तो स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देणारा आहे. याच विचारांशी सुसंगत पाऊल टाकत *‘तिघी’*च्या टीमने पुण्यातील रूबी… Read More स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी

स्वावलंबी ज्येष्ठांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली सात्विक होळी

स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा ठाम संदेश देणाऱ्या ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमने यंदाची होळी एका अर्थपूर्ण उपक्रमातून साजरी केली. पुण्यातील ‘मातोश्री ओल्डएज होम’ येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी रंग, गाणी आणि आनंदाची उधळण करत एक वेगळाच संदेश दिला. स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा ठाम विचार ‘तिघी’मध्ये ज्येष्ठ, स्वाभिमानी… Read More स्वावलंबी ज्येष्ठांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली सात्विक होळी

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय तुंबाडची मंजुळा

झी स्टुडिओजच्या नव्या रहस्यमय चित्रपटाची घोषणा; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो निसर्गरम्य सागरकिनारा, हिरवाईने नटलेली डोंगररांग आणि गावागावांत फिरणाऱ्या गूढ, रहस्यमय कथा. भूत-प्रेतांच्या गोष्टी, चुलीपाशी रंगणाऱ्या गजाली आणि वीतभर घडलेली गोष्ट हातभर करून सांगण्याची गावकुसातील शैली — या सगळ्या वातावरणातून एक नवा चित्रपट आकाराला येत आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत ‘तुंबाडची… Read More प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय तुंबाडची मंजुळा

‘सुपर डुपर’ सिनेमा ३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस!

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी ठरणारा हा चित्रपट ३ एप्रिलपासून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पोस्टरमधून कथानकाची भन्नाट झलक एका घराच्या दारात रंगलेला गोंधळ, एका बाजूला पारंपरिक कुटुंब आणि… Read More ‘सुपर डुपर’ सिनेमा ३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस!

६ मार्चला प्रदर्शित होणार आई–मुलींच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’

आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं… तरीही एकमेकींशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भावनांचा आविष्कार अधिक ठळकपणे मांडणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. ट्रेलर लाँच सोहळ्यात भावनांचा उधाण… Read More ६ मार्चला प्रदर्शित होणार आई–मुलींच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’